"Summer Holidays"- सोप्या आणि स्वस्त उपक्रमात उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलांना गुंतवा


"Summer Holidays" - हे दोन शब्द जितके मुलांना हवे हवे से वाटणारे आहेत तेवढेच पालकांना अंगावर काटा आणणारे आहेत. सुट्ट्यांमध्ये काही जण गावाला जातात , काही जण फिरायला जातात, काही पालक मुलांना कॅम्प ला पाठवतात. तरी काही पालकांना प्रश्न असतोच कि मुलांचे  मन कुठे गुंतवावे. अशा वेळेत कधी मुलं मोबाईल कडे वळतात पण असेही काही गोष्टी आहेत कि आपण त्यांचे मन गुंतवू शकतो 



कार्ड गेम्स [card Games] -UNO हा एक उत्कृष्ट कार्ड गेम आहे जिथे खेळाडू त्यांच्या हातात असलेल्या कार्डांशी जुळणारे वर्तमान शीर्ष कार्डाशी जुळतात, वळण, रंग किंवा क्रमांकानुसार.



रिडींग [Reading] - वाचनाची सवय खूप चांगली आहे. मुलांना लहान पणा पासूनच गोष्टीचे पुस्तके वाचायची सवय लागली तर पुढे जाऊन आवड निर्माण होते. सुरवातीला चित्र असलेले पुस्तके त्यांना द्यावीत , त्यांच्या सोबत बसून वाचावी तर त्यांनाहि समजेल आणि आवड निर्माण होईल.




पैंटिंग [Painting] - मुले त्यांची काल्पनिक शक्ती वापरून बरेच काही पैंटिंग करू शकतात जसेकी त्यांना leaf  पैंटिंग करायला सांगावे, सर्वात सोप्पं आणि स्वस्त पैंटिंग आणि मुलांना हि मजा येते,

मुलांना त्यांच्या फिंगर्स ने काही प्राणी किंवा फळभाज्या करायला सांगू शकता, Sponge  पैंटिंग म्हणजे कापसाचे किंवा sponge  असल्यास त्याच्या तुकड्याने पेंट करायला सांगावे.



pottery पैंटिंग - मातीच्या भांडी असल्यास किंवा मातीचे दिव्यांना पेंट करायला सांगावे , त्यावर काही मणी किंवा मोती असल्यास घरात ते हि त्यावर चिटकवायला सांगू शकतात.


कूकिंग [Cooking] - मुलांसोबत स्वयंपाक करणे हि एक मजेदार क्रिया असू शकते. सर्व मुलांना चॉकलेट केक बनवण्यात नक्कीच मजा येईल. किंवा त्यांच्या आवडीची रेसिपी बनवून त्यांना मदत करा आणि ते बनवताना त्यांना मदत करा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये निरोगी खाण्याची सवय देखील येईल.



हस्तकला [Craft] - घरात असणाऱ्या थर्माकॉलच्या प्लेट आणि ग्लास वापरून सुंदर पेन स्टॅन्ड करता येईल ,त्यावर त्यांना हवी तशी नक्षी करायला सांगू शकता. एकादे ग्रीटिंग करायला सांगावे. मुलांच्या पेन ,पेन्सिल इतर वस्तू घर भर पडलेल्या असतात , रिकाम्या बॉटलचे स्टॅन्ड त्यांना बनवायला सांगू शकता आणि सर्व वस्तू त्या मध्ये टाकायला सांगून सवय लावू शकता. 



पिठापासून वस्तू [dough items] - सगळ्यांच्या घरात गव्हाचे पीठ असतेच , मुलांना थोडी कणिक देऊन काप बशी , भांडे , फुल असे अनेक वस्तू बनायला सांगायचे , हळू हळू ते स्वतः त्याचे कल्पना शक्ती वापरून बनवतील.

वरील सगळ्या उपक्रम अर्थात आपल्याला लक्ष देऊन च करावे लागेल पण मुलांना त्याच्या उन्हाळा च्या सुट्ट्या मध्ये पण खूप काही शिकता येते त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुधारते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. उन्हाळ्यातील उपक्रमाच्या या आठवणी त्यांच्या मनात कायमच्या कोरल्या जातील.


Comments